

Badrinath Military Exhibition
esakal
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या बदरीनाथ दौऱ्यादरम्यान त्यांनी भारतीय सैन्याने आयोजित केलेल्या लष्करी प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी त्यांनी रायफल हातात घेत नेमबाजीचा सराव केला. तसेच अत्याधुनिक लष्करी शस्त्रे आणि तांत्रिक उपकरणांची माहिती जवानांकडून जाणून घेतली.
बदरीनाथ धाम येथील ‘टूरिस्ट अरायव्हल प्लाझा’मध्ये भारतीय सेना आणि चमोली जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने ‘ऑपरेशन सद्भावना’अंतर्गत ‘देवभूमी कल्चरल फेस्टिव्हल-२०२६’चे आयोजन करण्यात आले होते. ‘आमचा वारसा, आमचे भविष्य’ ही या दोन दिवसीय महोत्सवाची मुख्य संकल्पना होती. या महोत्सवाच्या सांगता समारंभाला मुख्यमंत्री धामी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.