cm yogi adityanath with Swag Rapper badshah
sakal
बॉलिवूडचा प्रसिद्ध रॅपर आणि गायक बादशहा सध्या गोरखपूर महोत्सवामुळे जबरदस्त चर्चेत आहे. मंगळवारी रात्री आयोजित 'बॉलिवूड नाईट'मध्ये आपला जलवा दाखवण्यापूर्वी बादशहाने गोरखनाथ मंदिराला भेट दिली. यावेळी त्याने केवळ देवाचे दर्शनच घेतले नाही, तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही भेट घेतली. या दोन दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या भेटीचे फोटो आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.