esakal | योगींच्या राज्यात भाजपच्या माजी मंत्र्याची टॉवेलने गळा आवळून हत्या; मृतदेह सापडला घरात
sakal

बोलून बातमी शोधा

Atmaram Tomar

भाजपा नेते आणि माजी मंत्री आत्माराम तोमर यांची राहत्या घरी टॉवेलने गळा आवळून हत्या करण्यात आलीय.

योगींच्या राज्यात भाजपच्या माजी मंत्र्याची टॉवेलने गळा आवळून हत्या

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

बागपत (उत्तर प्रदेश) : आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी (Uttar Pradesh Assembly election) राज्यात घडामोडींना वेग आलाय. उत्तरप्रदेशातील भाजपा नेते आणि माजी मंत्री आत्माराम तोमर यांची राहत्या घरी टॉवेलने गळा आवळून हत्या करण्यात आलीय. आज सकाळी हा प्रकार समोर आला असून पोलिसांनी तोमर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. बागपतचे भाजप नेते आणि माजी मंत्री आत्माराम तोमर (bjp former minister atmaram tomar) यांचा मृतदेह त्यांच्या निवासस्थानी संदिग्ध परिस्थितीत आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडालीय.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, टॉवेलच्या सहाय्यानं तोमर यांची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. घटनास्थळावरून तोमर यांची गाडीही गायब झालीय. आत्माराम तोमर यांचे बडौतच्या बिजरौल रोड येथे निवासस्थान आहे. याच निवासस्थानी त्यांची टॉवेलने गळा आवळून हत्या करण्यात आलीय आज (शुक्रवार) सकाळी तोमर यांचा ड्रायव्हर विजय तोमर यांच्या घरी आला असता, घराचा दरवाजा आतून बंद होता. कारही घराबाहेर नव्हती. त्यामुळे ड्रायव्हरला शंका आल्याने त्याने घराचा दरवाजा तोडला. त्यावेळी तोमर मृतावस्थेत आढळले.

हेही वाचा: जुलमी मोदी सरकार खोटी स्वप्नं दाखवून सत्तेत; नाना पटोलेंचा घणाघात

ड्रायव्हरने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, तोमर यांच्या हत्येबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. त्यामुळे त्यांच्या हत्येबाबत तर्कवितर्कांना उधाण आलीय. आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकी पूर्वीच भाजप नेत्याची हत्या झाल्याने मोठी खळबळ उडालीय. तोमर 1993 साली छपरौली विधानसभा मतदार संघातून भाजपाच्या तिकीटावर निवडून आले होते. 1997 साली भाजपाने त्यांना मंत्रिपद दिले होतं. तोमर हे जनता वैदिक कॉलेजचे मुख्य प्राध्यापक देखील राहिले आहेत.

loading image
go to top