esakal | छेड काढणाऱ्याला न्यायालयानं जामिनासाठी घातलेली अट वाचून व्हाल हैराण
sakal

बोलून बातमी शोधा

Court_2.jpg

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदौर खंडपीठाने छेडछाड प्रकरणातील एका आरोपीला जामीन मंजूर केला आहे. पण न्यायालयाने यासाठी एक अट ठेवली आहे

छेड काढणाऱ्याला न्यायालयानं जामिनासाठी घातलेली अट वाचून व्हाल हैराण

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

भोपाळ- मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदौर खंडपीठाने छेडछाड प्रकरणातील एका आरोपीला जामीन मंजूर केला आहे. पण न्यायालयाने यासाठी एक अट ठेवली आहे. आरोपीने रक्षाबंधन दिवशी पीडितेच्या घरी जाऊन तिच्याकडून राखी बांधून घ्यावी आणि तिच्या सुरक्षेचे वचन द्यावे. आरोपी विक्रम बागरी उज्जैनमधील तुरुंगात कैद आहे. एप्रिल महिन्यात शेजारी राहणाऱ्या एका महिलेच्या घरी घुसून छेडछाड केल्या प्रकरणी तुरुंगात असणाऱ्या विक्रमने इंदौर न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली होती. 

विषारी दारु प्यायल्याने आतापर्यंत 86 जणांचा मृत्यू

सर्व पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्ती रोहित आर्या यांनी आरोपी विक्रम याला 50 हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. मात्र, त्यासाठी आरोपीने 3 ऑगस्ट रक्षाबंधन रोजी सकाळी 11 वाजता स्वत:च्या पत्नीला घेऊन पीडितेच्या घरी राखी आणि मिठाई घेऊन जावे आणि पीडितेला आग्रह करावा की भाऊ समजून तिने त्याला राखी बांधावी, अशी भन्नाट अट न्यायालयाने ठेवली आहे.

याशिवाय आरोपी विक्रमने पीडितेला सुरक्षेचे वचन द्यावे आणि ओवाळणी म्हणून त्याने पीडितेला 11 हजार रुपये द्यावे. तसेच पीडितेच्या मुलाला कपडे आणि मिठाई खरेदी करण्यासाठी 5 हजार रुपये द्यावे. इतकेच नाही तर या सगळ्याचे फोटो रजिस्ट्रिमध्ये सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. 

कोविड-19 ची परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकारने काढलेल्या सर्व सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांचे पालन करेल, असंही आरोपीला लिहून देण्यास न्यायालयाने सांगितलं आहे.

(edited by-kartik pujari)

loading image