Jammu Kashmir Eid : जम्मू-काश्मीरमध्ये बकरी ईद शांततेत आणि धार्मिक उत्साहात साजरी झाली; मात्र सलग सातव्या वर्षी श्रीनगर ईदगाहवर नमाजास परवानगी मिळाली नाही.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली. हजारो नागरिकांनी मशिदी आणि ईदगाहमध्ये विशेष नमाज अदा केली. मात्र, सलग सातव्या वर्षी श्रीनगरमधील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज अदा करण्यात आली नाही.