

बनारसी साडी
esakal
काशी म्हणजेच बनारस शहर हे आपल्या अध्यात्म आणि संस्कृतीसाठी जगभर प्रसिद्ध आहेच, पण या शहराची आणखी एक ओळख म्हणजे येथील 'बनारसी सिल्क साडी' (Banarasi Silk Saree)! या साडीची चमक, पोत, अद्भुत विणकाम आणि राजेशाही थाट याला तोड नाही. म्हणूनच जगभरातील महिलांच्या कपाटात किमान एक तरी बनारसी साडी असतेच.