बांगलादेश आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर; रात्रीत इंधन दरात 50 टक्क्यांची वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांगलादेश आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर; रात्रीत इंधन दरात 50 टक्क्यांची वाढ

बांगलादेश आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर; रात्रीत इंधन दरात 50 टक्क्यांची वाढ

संपूर्ण जगभरात महागाईचा कहर सुरु आहे. दिवसेंदिवस जीवनावश्यक वस्तुंचे भाव वाढत आहेत त्यामुळे अनेक देशांना मोठी किंमत चुकवावी लागत आहे. श्रीलंका, पाकिस्तान या देशांना महागाईचे सर्वाधिक चटके बसले आहेत. या देशांवर मंदीचे काळे ढग दाटले असून आता श्रीलंकेपाठोपाठ बांगलादेशही आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर आहे.

बांगलादेशात एका रात्रीत इंधनाच्या दरात 50 टक्क्यांची वाढ झाली आहे. बांगलादेशच्या इतिहासात आतापर्यंतची ही सर्वाधिक इंधन दरवाढ मानली जात आहे. रात्रीपासूनच पेट्रोल पंपावर रांगाच रांगा पाहायला मिळत आहेत. गेल्या आठ वर्षांतील सर्वाधिक महागाईची कळ सोसणाऱ्या बांगलादेशच्या नागरिकांमध्ये इंधन दरवाढीमुळे संतापाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

हेही वाचा: 'या जन्मातच काय, तर पुढच्या सात जन्मातही नितीश कुमार पंतप्रधान होऊ शकणार नाहीत'

यासंदर्भात बांग्लादेशच्या मंत्रालयानं बांग्लादेशच्या वीज, ऊर्जा आणि खनिज संसाधन मंत्रालयानं इंधनाच्या किमती वाढण्यासंदर्भात एक निवेदन जारी केलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किमतींत वाढ झाल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यात म्हटलं आहे. कमी किमतींत इंधन विकल्यामुळे बांगलादेश पेट्रोलियम कॉर्पोरेशन (BPC) ला फेब्रुवारी ते जुलै दरम्यान 8, 014.51 टक्‍यांचं नुकसान झालं आहे.

पेट्रोल-डिझेलच्या दरात 51.7 टक्के वाढ झाली असून आधीच महागाईचा सामना करणाऱ्या जनतेला हा दुहेरी फटका आहे. रात्री 12 वाजल्यापासून लागू झालेल्या नवीन किमतींनुसार, एक लिटर ऑक्टेनची किंमत आता 135 रुपये झाली आहे, जी पूर्वीच्या 89 टक्‍के दरापेक्षा 51.7 टक्के अधिक आहे. आता बांगलादेशात एक लिटर पेट्रोलची किंमत आता 130 टक्‍के आहे, म्हणजेच काल रात्रीपासून 44 टक्‍के किंवा 51.1 टक्‍क्‍यांनी वाढली आहे.

हेही वाचा: PM Modi : सरकारच्या तिजोरीवर पहिला हक्क कोणाचा असायला हवा?, वरुण गांधींचा सवाल

दरम्यान, श्रीलंकेतील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशची जनताही सरकारविरोधात रस्त्यावर उतरली आहे. ठिकठिकाणी नागरिकांकडून जाळपोळ आणि आंदोलनं करण्यात येत आहेत. त्यातच बांगलादेश आयएमएफ अर्थात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कर्जात बुडाला आहे. बांगलादेशवर आयएमएफच्या 762 मिलियन डॉलरच्या कर्जाचा डोंगर आहे.

Web Title: Bangladesh Increased Petrol Diesel Inflation Rate Letter To Loan For World Bank After Sri Lanka

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..