
Bangladesh PM Sheikh Hasina Dance : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून, आज त्यांनी राजस्थानची राजधानी जयपूरला भेट दिली. यावेळी त्यांचे जयपूर विमातळावर खास राजस्थानी शैलीतील लोकनृत्य संगीताने स्वागत करण्यात आले. लोककलावंतांचा हा डान्स बघून हसिना यांना डान्स करण्याचा मोह आवरला नाही आणि त्यांनी बघता बघता कलाकारांसोबत डान्स करण्यास सुरूवात केली. तसेच त्यानंतर कलाकारांसोबत फोटोही काढले. हा सर्व प्रकार घडत असताना पंतप्रधान हसिना यांच्यासोबत त्यांचे शिष्टमंडळही उपस्थित होते. हसिना 80 सदस्यीय टीमसह अजमेर येथील गरीब नवाज ख्वाजा मोईनुद्दीन हसन चिश्ती यांच्या दर्ग्याला भेट देणार आहेत.
दरम्यान, पीएम हसिना यांच्या अजमेर दौऱ्यासाठी जिल्हा प्रशासन हाय अलर्टवर असून दर्गा परिसरासह संपूर्ण शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यासोबतच दर्ग्याच्या सर्व गेटवर पोलीस आणि हडिरानी बटालियनचे जवान तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय परिसरात ड्रोनद्वारेही बारीक लक्ष ठेवले जाणार आहे.
बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्यावर तयार होतोय बायोपिक
भारत-बांग्लादेश संबंधांबाबत पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या की, भारत-बांग्लादेश यांच्यातील सांख्यिकीय भागीदारी गेल्या दशकात अधिक वाढली आहे. 50 वर्षांच्या मजबूत संबंधांमध्ये दोन्ही देशांनी अनेक क्षेत्रात आपली भागीदारी पुढे नेली आहे. याशिवाय सागरी आणि सीमा विवाद सोडवण्यासाठी दोन्ही नेत्यांनी चर्चा पुढे नेली असून, भारत आणि बांगलादेश संयुक्तपणे बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्यावर बायोपिक बनवत आहेत. ज्यावर काम सुरू असून, तो लवकरच प्रदर्शित होईल अशी अपेक्षा हसिना यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.