Government Scheme : 'आधार'ला Bank अकाऊंट नंबर लिंक असणं आवश्यक, अन्यथा मिळणार नाही 'या' योजनेचा लाभ!

राज्य शासनाने कुटुंबातील प्रत्येकाला मोफत दहा किलो तांदूळ देण्याची घोषणा केली होती.
Bank account number linked to Aadhaar card Ration Card
Bank account number linked to Aadhaar card Ration Cardesakal
Summary

तांदळापोटी रक्कम जमा करण्याबद्दल येथील प्रशासनाला खात्याकडून अद्यापपर्यंत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. यामुळे स्थानिक प्रशासनही याबद्दल अनभिज्ञ आहे.

निपाणी : तालुक्यातील ज्या शिधापत्रिकांनी अद्याप आधारला बॅंकेचा अकाऊंट (Bank Account) नंबर लिंक केलेला नाही, अशांनी आधार लिंकचे (Aadhaar Card Link) आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

मोफत तांदळापोटी राज्य शासनाकडून जमा होणारी रक्कम शिधापत्रिकाधारकांच्या थेट खात्यात जमा होणार असल्याने आधारला अकाऊंट नंबर लिंक आवश्यक आहे. राज्य शासनाने कुटुंबातील प्रत्येकाला मोफत दहा किलो तांदूळ देण्याची घोषणा केली होती.

Bank account number linked to Aadhaar card Ration Card
Belgaum : जैन मुनींच्या मृतदेहाचे तुकडे करून टाकले कूपनलिकेत; संशयितांकडून हत्येची कबुली, मठाकडं भाविकांची रीघ

मात्र, केंद्र शासनाकडून तांदूळ पुरविला जात नसल्याने राज्य शासनाने तांदळाऐवजी थेट शिधापत्रिकाधारकांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. १० जुलैपासून ही रक्कम शिधापत्रिकाधारकांच्या खात्यावर जमा करणार असल्याचे शासनाकडून सांगण्यात आले आहे.

शिधापत्रिकाधारकांच्या खात्यावर रक्कम जमा होण्याबद्दल स्थानिक प्रशासनाला कोणतेही स्पष्ट आदेश नाहीत, तरीही शिधापत्रिकाधारकांची वारंवार विचारणा होत असल्याने येथील अधिकाऱ्यांनी आवाहन केले आहे. यापूर्वी बहुतेक शिधापत्रिकाधारकांनी आधारकार्ड बॅंक अकाऊंटशी लिंक केले आहे.

Bank account number linked to Aadhaar card Ration Card
Ratnagiri Politics : ठाकरे सेनेचा 'हा' निष्ठावंत शिलेदार रत्नागिरीतून रिंगणात? भास्कर जाधवांना लोकसभेची ऑफर

तरीही असंख्य शिधापत्रिकाधारकांनी आधार लिंक केलेले नाही. आधार लिंक नसल्यास तांदळापोटीची रक्कम खात्यावर जमा न होण्याचा धोका आहे. लाभापासून शिधापत्रिकाधारकांना वंचित राहावे लागू नये यासाठी खबरदारी म्हणून प्रशासनाने आवाहन केले आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्यामागे १७० रुपये जमा होणार आहेत.

निपाणी तालुक्यात ६७ हजार ४०५ बीपीएल, १७ हजार ९०८ एपीएल तर १ हजार ५८० शिधापत्रिकाधारक आहेत. जवळपास तालुक्यात ८६ हजार ९१३ एवढी एकूण शिधापत्रिकाधारकांची संख्या आहे. जर तांदळापोटी रक्कम जमा झाल्यास सर्वांच्या खात्यावर मिळून निपाणी तालुक्यात येणारी रक्कम कोटीच्या घरात पोहोचणार आहे.

Bank account number linked to Aadhaar card Ration Card
NCP Crisis : अजितदादा गटाच्या लवकरच होणार पदाधिकारी निवडी; रामराजेंवर मोठी जबाबदारी

प्रशासन अनभिज्ञ

तांदळापोटी रक्कम जमा करण्याबद्दल येथील प्रशासनाला खात्याकडून अद्यापपर्यंत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. यामुळे स्थानिक प्रशासनही याबद्दल अनभिज्ञ आहे. शिधापत्रिकाधारक याबद्दल विचारणा केल्यावर अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही गोंधळ उडत आहे.

तांदळापोटी जमा होणारी रक्कम थेट शिधापत्रिकाधारकांच्या थेट खात्यात जमा होणार आहे. त्याबद्दल येथील प्रशासनाला स्पष्ट आदेश नाहीत. शिधापत्रिकाधारकांच्या आधारला अकाऊंट नंबर लिंक असणे आवश्यक आहे.

- विजयकुमार कडकोळ, तहसीलदार, निपाणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com