

Police seized demonetised old currency notes worth Rs 1.43 crore from a suspect during a vehicle-checking operation in Hapur
esakal
उत्तर प्रदेशात १७ कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या बनावट नोटा सापडल्याप्रकरणी तपास सुरू असतानाच हापूरमध्ये पोलिसांच्या हाती नोटाबंदी झालेल्या जुन्या नोटांचा मोठा साठा लागला आहे. वाहन तपासणीदरम्यान पोलिसांनी एका दुचाकीस्वाराला ताब्यात घेतले. त्याच्याकडून तब्बल १.४३ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या नोटांच्या देवाणघेवाणीमागे एखादे रॅकेट किंवा संघटित नेटवर्क कार्यरत आहे का, याचा तपास आता सुरू करण्यात आला आहे.