बोम्मई हेच मुख्यमंत्रीपदी राहतील - अरुण सिंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arun Singh
बोम्मई हेच मुख्यमंत्रीपदी राहतील - अरुण सिंग

बोम्मई हेच मुख्यमंत्रीपदी राहतील - अरुण सिंग

बंगळूर - मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांच्या पायउतारची कोणतीही शक्यता नाही. तेच मुख्यमंत्री (Chief Minister) पदावर कायम राहतील, असे भाजपचे राज्य सचिव अरुण सिंग (Arun Singh) यांनी आज (ता. ३) स्पष्ट केले. यामुळे काही दिवसांपासून मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू होती. त्याला पूर्वविराम मिळाला.

भाजप नेते आमदार बसवराज यत्नाळ-पाटील यांनी येत्या १० मेपूर्वी राज्यात फेरबदल शक्य आहे. नवीन मुख्यमंत्र्यांची निवड होण्याची दाट शक्यता आहे, असा दावा प्रसारमाध्यमापुढे केला होता. यामुळे चांगलीच खळबळ उडाली. राजकीयस्तरावर उलटसुलट चर्चाला उधाण आले आहे. यामुळे या संदर्भात अरुण सिंग यांनी आज स्पष्टीकरण दिले. बोम्मई यांच्याकडेच पदभार असेल. त्यांना पायउतार होण्याचे कोणतेही संकेत नाहीत. आपण तशा स्वरूपाच्या प्रश्‍नांना उत्तर देणार नाही. जनतेच्या अपेक्षेनुसार राज्य सरकार काम करत आहे. बोम्मई ‘कॉमन मॅन’ म्हणून जनतेत मिसळून काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात कामकाज व्यवस्थित सुरू आहे, असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, ‘मुख्यमंत्री बोम्मई यांनी अलीकडे अर्थसंकल्प सादर केला. सामान्य जनतेला डोळ्यांपुढे ठेवून अर्थसंकल्प सादर केला आहे. यामुळे जनता बोम्मई यांच्या नेतृत्वाची मागणी करत आहे. त्यांना बदलण्याची मागणी नाही. २०२३ मध्ये विधानसभा निवडणूक आहे. त्याचे नेतृत्वही बोम्मई करतील. आमदार बसवराज पाटील-यत्नाळ यांनी याबाबत काय टिप्पणी केली आहे, त्यावर आपल्याला बोलायचे नाही आणि तुम्हीही ऐकत जाऊ नका. मंत्रिडळामध्ये कोणाचा समाविष्ट करायचे व कोणाला डच्चू द्यायचे, याबाबचे अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे, असेही ते म्हणाले.’

स्वप्न पाहू नका - आर. अशोक

राज्यात नेतृत्व बदलण्याच्या हालचाली नाहीत. यामुळे कोणी मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहू नये, असे सांगत महसूलमंत्री आर. अशोक यांनी आमदार बसवराज पाटील-यत्नाळ यांचा चिमटा काढला. मंत्री अशोक आज (ता. ३) प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मुख्यमंत्र्यांना बदलण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे. विधान परिषद सभापती बसवराज होरट्टी यांच्या भाजप प्रवेशाला अमिश शहा यांनी हिरवा कंदील दाखविला आहे. यामुळे लवकरच ते भाजपमध्ये दाखल होतील. त्यांच्यामुळे उत्तर कर्नाटकात भाजपला अधिक बळकटी मिळणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Basavaraj Bommai Will Remain The Chief Minister Arun Singh Politics

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top