‘भारतीय वायुसेनेने अल्प सूचनांवर ऑपरेशनसाठी तयार असावे’

Vivek Ram Chaudhary
Vivek Ram ChaudharyVivek Ram Chaudhary

सध्याची भू-राजकीय परिस्थिती पाहता भारतीय वायुसेनेने अल्प सूचनांवर ऑपरेशनसाठी सदैव तयार असले पाहिजे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध तिसऱ्या महिन्यात दाखल झाले आहे. एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी (Vivek Ram Chaudhary) यांनी यातून निर्माण होणाऱ्या गंभीर आव्हानांचा उल्लेख केला. (Be prepared for immediate operation)

विवेक राम चौधरी हे युक्रेनमध्ये (Ukraine) सुरू असलेल्या युद्धाबाबत बोलत होते, असे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे. गुरुवारी (ता. २८) सेमिनारला संबोधित करताना ते म्हणाले की, काही ऑपरेशन करावे लागेल आणि आमच्याकडे वेळ कमी राहील, असे व्हायला नको. युक्रेन युद्धात हायपरसॉनिक शस्त्रे वापरली जातील अशा बातम्या येत आहेत.

भारतीय हवाई दलही (Indian Air Force) अशी शस्त्रे स्टॉकमध्ये ठेवण्याची योजना करीत आहे. हायस्पीड हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांना रोखणे कठीण आहे. त्यामुळे भारतीय वायुसेनेने त्यास सामोरे जाण्यासाठी सज्ज राहावे, असे सुमारे दोन आठवड्यांपूर्वी एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी म्हणाले होते.

Vivek Ram Chaudhary
५१ वर्षीय बेरोजगार मुलाने केली ७८ वर्षीय आईची हत्या; स्वतः घेतले वीष

युद्धसदृश परिस्थिती उद्भवल्यास लॉजिस्टिक सपोर्ट हे सर्वांत मोठे आव्हान असेल. कारण, सैन्याचा साठा मोठ्या भागात पसरलेला आहे. लष्कराने ताबडतोब सुरू होणाऱ्या कोणत्याही युद्धासाठी आणि पूर्व लडाखमध्ये सुरू असलेल्या दीर्घकाळ टिकणाऱ्या तणावासाठी सज्ज असले पाहिजे, असेही एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी (Vivek Ram Chaudhary) म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com