PM Kisan : ‘पीएम किसान’ सर्वेक्षणात महाराष्ट्रातला हा जिल्हा संपूर्ण देशात अव्वल, मोदींच्या जिल्ह्याची स्थिती काय ? घ्या जाणून

गुजरात राज्याची ही स्थिती केवळ २६४७ आहे
PM Kisan
PM Kisan Sakal

बीड : ‘प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत’ संपूर्ण सर्वेक्षणाच्या कामात बीड जिल्हा देशात अव्वल ठरत आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जिल्ह्याच्या तब्बल १३९ पट शेतकऱ्यांचे संपूर्ण सर्वेक्षण झाले आहे.

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, हरियाणा, पंजाब आदी राज्यांचा या मोहिमेत समावेश आहे. या योजनेत जिल्ह्यातील तीन लाख ६९ हजार ९३३ शेतकऱ्यांचे संपूर्ण सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. तर, गुजरात राज्याची ही स्थिती केवळ २६४७ आहे. विशेष म्हणजे ऊसतोड मजुरांचे सर्वाधिक स्थलांतर होणारा हा जिल्हा असून पंधरवड्यापासूनच मजुरांचे स्थलांतर होऊनही वेगाने काम करण्यात यंत्रणेला यश आले आहे.

PM Kisan
Health Tips : लवकर म्हातारे व्हायचं नसेल तर भोपळा खा, डिप्रेशनपासूनही वाचवतो अन् ताजेपणा देतो

केंद्र शासनाने पथदर्शी प्रकल्प म्हणून ‘पीएम किसान सॅच्युरेशन अभियान’ हाती घेतले आहे. देशातील पाच जिल्ह्यांमध्ये हाती घेतलेल्या अभियानात शेतकऱ्यांच्या शेतजमिनीची माहिती, खात्यांची माहिती याची पडताळणी केली जाणार आहे. शासनातर्फे शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या विविध योजनांसाठी ई-केवायसी, ई सायनिंग आदी कामे हाती घेण्यात येणार आहेत.

PM Kisan
Uric Acid Control Tips : युरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यासाठी ‘या’ भाज्यांचा करा आहारात समावेश

यातून शेतकऱ्यांचा एक ओळख क्रमांक तयार करून त्यावर संबंधित शेतकऱ्यांच्या शेतीशी संबंधित माहिती संकलित करून ती आधारशी जोडली जाणार आहे. एखाद्या शेतकऱ्याच्या जमिनीच्या क्षेत्रात भविष्यात काही बदल झाले तर ते आपोआप या ठिकाणी नोंदविले जाणार आहेत. यामुळे शेतकऱ्याला प्रत्येकवेळी ई-केवायसी करावी लागणार नाही. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने या अभियानासाठी प्रत्येक गावात तलाठी आणि इतर कर्मचारी यांच्यामार्फत हे काम केले जात आहे. यात देशात सर्वाधिक काम बीड जिल्ह्यात झाले आहे. विशेष म्हणजे पंतप्रधानांचे गुजरात सर्वांत पिछाडीवर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com