बिअर मॅगी प्यायची की खायची? सोशल मीडियावर होतेय चर्चा

टीम ई सकाळ
Thursday, 24 December 2020

बीअर मॅगीचा व्हिडिओ पाहून 2020 मध्ये आता एवढंच बघायचं बाकी होतं अशा प्रकारच्या प्रतिक्रिया यावर येत आहेत. 

नवी दिल्ली - सोशल मीडियावर कधी कोणता ट्रेंड सुरू होईल सांगता येत नाही. कधी ट्रोलिंग सुरु असतं तर कधी कौतुक. कधी कधी विचित्र गोष्टीही ट्रेंडमध्ये येतात. आताही असाच एक ट्रेंड सुरू आहे. दोन मिनिटात तयार होणाऱ्या मॅगीमध्येही पाककौशल्य दाखवल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बीअर मॅगीचा व्हिडिओ पाहून 2020 मध्ये आता एवढंच बघायचं बाकी होतं अशा प्रकारच्या प्रतिक्रिया यावर येत आहेत. 

मॅगी तयार करताना वेगवेगळे प्रयोग केल्याचं याआधीही अनेकदा चर्चेत आलं होतं. यात कधी लोक मॅगी गोड करतात तर कधी दूधात उकळतात. आताही कोणी कल्पना केली नसेल असा प्रकार समोर आला आहे. बिअर मॅगीच्या नावाने चक्क पदार्थ विकला जात आहे. 

सोशल मीडियावर मात्र ही मॅगी लोकांना आवडलेली नाही. यामध्ये बिअर नाही तर फक्त मसाला आणि ब्रोथ आहे. लोकांनी या रेसिपीला ट्रोल केलं असून ट्विटरवर शेअर करताना वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by So Delhi (@sodelhi)

इन्स्टाग्रामवरील पेज sodelhi ने हा व्हिडिओ शेअर केला होता. त्याच्या कॅप्शनमध्ये म्हटलं होतं की, हाउसफुलच्या या बिअर मॅगीबद्दल तुम्हाला काय वाटतं? ही बिअर नाही तर यात फक्त ब्रोथ आणि मसाला मॅगीचा रस आहे. 

बिअर मॅगीचा हा व्हिडिओ इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. ट्विटरवर एका युजनं म्हटलं की, बिअर मॅगी प्या मित्रांनो. तर काहींनी ही मॅगी बिअर खायची कि प्यायची असाही प्रश्न विचारला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: beer maggi in delhi cafe troll on social media