
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. फेसबुकवर मेसेजद्वारे पोस्ट टाकून शिरच्छेद करण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.(beheading threat to up cm yogi adityanath was reported in Moradabad)
या धमकीबद्दल मुरादाबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यूपीच्या मुख्यमंत्र्यांचा शिरच्छेद करण्याची धमकी देणारी पोस्ट मिळाली आहे. , फेसबुकवर मुरादाबाद पोलिसांच्या नावाने एक फेक पेज तयार करण्यात आले असून, त्यावरून अशा पोस्ट करण्यात आल्या आहेत. आत्मप्रकाश पंडित नावाच्या अकाऊंटवरून ही पोस्ट करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आत्मप्रकाश पंडित यांचे म्हणणे आहे की, त्यांचे खाते हॅक करून कोणीतरी हे काम केले आहे.
ज्या पेजवरून मुख्यमंत्र्यांना धमकी देण्यात आली आहे, त्या पेजवर पाकिस्तानचा झेंडा आहे. त्यात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचाही फोटो आहे.
एका ट्विटर युजरने ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली, त्यानंतर यूपी पोलिसांचा सायबर सेल सक्रिय झाला आणि तपास सुरू केला. पोलिस लवकरच योग्य आरोपीपर्यंत पोहोचतील आणि त्याला अटक करण्यात येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
सीएम योगी यांना जीवे मारण्याची धमकी मिळण्याची गेल्या दोन वर्षांत ही 11वी वेळ आहे. धमकी प्रकरणी आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या क्रमातील पहिली धमकी 24 एप्रिल 2020 रोजी देण्यात आली होती. तेव्हापासून धमक्यांची मालिका सुरूच आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.