Belgaum Crime News
esakal
बेळगाव : बैलहोंगल तालुक्यातील नेगिनहाळ गावात पतीने पत्नीचा निर्घृण खून (Wife Killed By Husband) केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. २१) उघडकीस आली. विवाह होऊन तीन वर्षे उलटूनही अपत्य होत नसल्याच्या कारणावरून सुरू असलेल्या सततच्या घरगुती वादातून ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.