Chorla Ghat Crime
esakal
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील चोर्ला मार्गावर ऑक्टोबर २०२५ मधील सुमारे ४०० कोटी रुपयांची कथित लूट (Chorla Ghat Crime) झाल्याच्या प्रकरणाची चौकशी आता बेळगाव जिल्हा पोलिसांकडूनही सुरू झाली आहे. यासंदर्भात तपासाबाबतचे महत्त्वाचे पत्र शुक्रवारी जिल्हा पोलिसप्रमुख कार्यालयाला प्राप्त झाले असून प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलिसप्रमुख के. रामराजन यांनी दै. ‘सकाळ’शी बोलताना दिली.