Belagav DCC Bank Election 2025
esakal
१६ पैकी नऊ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली.
सात जागांसाठी आता निवडणूक होणार आहे.
शेवटच्या क्षणापर्यंत खलबते सुरू होती; मात्र यश मिळाले नाही.
बेळगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये १६ जागांपैकी नऊ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे उर्वरित सात जागांसाठी निवडणूक (Belagav DCC Bank Election 2025) होणार असल्याचे निश्चित झाले आहे. शेवटच्या क्षणापर्यंत उर्वरित सात मतदारसंघात उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात (Karnataka Political Updates) आले आहेत. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या घटकेपर्यंत खासगी हॉटेलमध्ये राजकीय खलबते सुरू होती. मात्र, यामध्ये यश आलेले नाही. त्यामुळे निवडणूक होणार असल्याचे निश्चित झाले आहे.