Electric Shock Death
esakal
बेळगाव : विजेच्या धक्क्याने शाळकरी विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना (Electric Shock Death) शुक्रवारी (ता. २) सकाळी आठच्या सुमारास घडली आहे. परिनीती चंद्रू पालकर (वय १३, रा. महात्मा फुले गल्ली, सांबरा) असे तिचे नाव असून, ती सांबरा येथील सरकारी मराठी प्राथमिक शाळेत सातवीत शिक्षण घेत होती.