बेळगाव : गर्भवती महिलेने (Pregnant Woman) गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता. ९) विजय गल्ली, मच्छे येथे घडली. अनिता नीलेश नांद्याळकर (वय २५) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. अनिताच्या कुटुंबीयांनी नीलेश याच्यासह त्याच्या घरच्या मंडळींवर अनिताचा छळ केल्याचा आरोप केला आहे. घटनेनंतर पोलिसांनी (Police) नीलेश याला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी केली जात आहे.