Belagav Bank Election
esakal
बेळगाव : बेळगावातील एका नामांकित हॉटेलमध्ये १८ मतदारांना डांबून ठेवण्यात आल्याची तक्रार कॅम्प पोलिसांत आज (ता. १९) देण्यात आली. बेळगावात जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची आज (ता. १९) निवडणूक (Belagav Bank Election) होती. यानिमित्त आलेल्या मतदारांना मतदान केंद्रापर्यंत जाऊ दिले नाही, असा आरोप तक्रारीत केली आहे. दरम्यान, कॅम्प पोलिसांनी तक्रार प्राप्त झाली आहे. त्याची चौकशी करण्यात येईल, त्यानंतर कारवाईची दिशा ठरविली जाईल, असे सांगितले.