

Fish harvest from Belagavi reservoirs
sakal
बेळगाव : कृषिप्रधान ओळख असलेल्या बेळगाव जिल्ह्यात आता ‘रूपेरी पीक’ झळकत आहे. अवघ्या आठ महिन्यांत तब्बल १२,३६० टन मस्य उत्पादन झाल्याने पारंपरिक शेतीबरोबरच मत्स्यशेतीही कमाईचा शाश्वत पर्याय ठरू लागली आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील २०० हून अधिक कुटुंबे या व्यवसायात सक्रिय झाली आहेत.