Managutti Shivaji Maharaj statue case latest news
esakal
बेळगाव : मनगुत्ती (ता. हुक्केरी) येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटविल्यानंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर दाखल खटल्यातील महत्त्वाचे साक्षीदार तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक रमेश पाटील (यमकनमर्डी पोलिस ठाणे) हे साक्षीसाठी सलग चौथ्यांदा गैरहजर राहिल्याने न्यायालयाने काल (ता. १) त्यांच्याविरोधात वॉरंट जारी करण्याचा आदेश दिला.