बेळगाव जिल्ह्यात हवाई, नौदलाने वाचविले 45 जणांना

सकाळ वृत्तसेवा
Friday, 9 August 2019

बेळगाव - जिल्ह्यातील गोकाक व रामदूर्ग तालुक्यातील पूरस्थिती गंभीर झाली आहे. पुरात अडकलेल्याना बाहेर काढण्यासाठी हवाई दल व नौदलाची मदत घेण्यात आली आहे. जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यानी दिलेल्या माहितीनुसार दोन दिवसात 45 जणांना पुराच्या वेढ्यातून बाहेर काढण्यात आले आहे. यासाठी तीन हेलीकाॅप्टरचा वापर करण्यात आला आहे.

हिरण्यकेशी नदीला पूर आल्यामुळे गोकाक तालुक्यातील उदगट्टी गावात 7 जण अडकले होते. हेलीकाॅप्टरच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले. मलप्रभा नदीला आलेल्या पुरात हालोळी गावचे 21 जण अडकले होते, त्यांनाही बाहेर काढण्यात आले. मुधोळ तालुक्यातील गिरदाळ व रूगी येथील 20 जणाना वाचविण्यात आले आहे. उदगट्टी गावात खाद्यपदार्थांच्या 320 पाकीटांचे वाटप करण्यात आले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Belgaum district rescues 45 people by navy