Belagavi Chikodi Electionsakal
देश
Belagavi Election : तालुका, जिल्हा पंचायत निवडणुकीच्या हालचाली आयोगाकडून कच्ची मतदार यादी जाहीर; आक्षेपासाठी २८ पर्यंत मुदत
Belagavi Chikodi Election : बेळगाव जिल्हा पंचायत व तालुका पंचायत सदस्यांचा कार्यकाळ संपून तीन वर्षे झाली तरी निवडणूक घेण्यास सरकार उत्सुक नसल्याचे दिसत आहे.
चिक्कोडी : बेळगाव जिल्हा पंचायत व तालुका पंचायत सदस्यांचा कार्यकाळ संपून तीन वर्षे झाली तरी निवडणूक घेण्यास सरकार उत्सुक नसल्याचे दिसत आहे. मात्र, आता निवडणूक आयोगाने मतदार यादी अपडेट करण्याचे काम सुरू केले आहे. कच्ची मतदार यादी २९ ऑक्टोबरला जारी केली असून, २८ नोव्हेंबरपर्यंत आक्षेप नोंदविण्याची मुदत दिली असल्याने जिल्हा व तालुका पंचायत निवडणुकीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

