बेळगाव (कर्नाटक) : मुडलगी तालुक्यातील शिवापूर गावात स्थित अडवीसिद्धेश्वर मठात घडलेल्या एका प्रकाराने गावात मोठी खळबळ उडालीये. मठाचे स्वामी अडवीसिद्धराम एका महिलेसह त्यांच्या खोलीत आढळून आले, ज्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी मठातच गर्दी करत स्वामींना जाब विचारला. या वादळी घटनेने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.