बेळगाव-नागपूर विमानसेवेसाठी १५ एप्रिलपासून बुकिंग बंद केली आहे. तीन वर्षांचा कालावधी संपल्याने त्यांनी निर्णय घेतला आहे.
बेळगाव : उत्तम प्रतिसाद असूनही बेळगाव ते नागपूर दरम्यानची विमानसेवा (Belgaum to Nagpur Flight) १५ एप्रिलपासून बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागपूरला जाण्यासाठी बेळगावकरांना अन्य मार्गाचा आसरा घ्यावा लागत आहे. या दरम्यानची बुकिंग बंद करण्यात आली आहे. ही विमानसेवा बंद झाल्यानंतर फक्त सहा शहरांत विमानसेवा सुरू असेल.