बेळगावात बसमध्ये 50 हजाराची पाकीटमारी 

संजय सूर्यवंशी 
बुधवार, 6 जून 2018

बेळगाव - वडिलांवर शस्त्रक्रीयेसाठी आणलेली 50 हजाराची रक्कम बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन पाकीटमाराने लांबविली. या प्रकरणी सदाशिव यशवंत संकपाळ (32, रा. गुंडेवाडी, ता. अथणी) या तरुणाने एपीएमसी पोलिसांत फिर्याद दिली आहे. 

बेळगाव - वडिलांवर शस्त्रक्रीयेसाठी आणलेली 50 हजाराची रक्कम बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन पाकीटमाराने लांबविली. या प्रकरणी सदाशिव यशवंत संकपाळ (32, रा. गुंडेवाडी, ता. अथणी) या तरुणाने एपीएमसी पोलिसांत फिर्याद दिली आहे. 

याबाबत तरुणाने दिलेली माहिती अशी की, त्याच्या वडिलांना केएलई रूग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल केले आहे. त्यासाठी 50 हजाराची रक्कम घेऊन हा तरुण मंगळवारी (ता. 5) बेळगावात आला. आज सकाळी त्याला डॉक्‍टरांना रूग्णासाठी वेगळे चप्पल, टोपी व अन्य साहित्य आणण्यास सांगितले. यासाठी सदाशिव केएलईजवळून बस पकडून बाजारपेठेत गेला. त्या ठिकाणी आवश्‍यक ते साहित्य खरेदी करून दुपारी पाऊणच्या सुमारास तो पुन्हा सीबीटीवर येऊन बसमध्ये चढला. सीबीटी ते चन्नम्मा सर्कलपर्यंत बसमध्ये फारशी गर्दी नव्हती. परंतु, चन्नम्मा सर्कलमध्ये बस खचाखच भरली. यावेळी सदाशिव हा बसमध्ये थांबला होता. गर्दीचा फायदा घेऊन भामट्याने पॅन्टच्या चोरखिशात ठेवलेली रक्कम समोरील बाजूला ब्लेडने कापत लांबविली.

सदाशिव जेव्हा केएलईजवळ उतरला तेव्हा आपली रक्कम चोरीला गेल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने तातडीने बेळगावात राहणारा त्याचा मित्र शिवराज सौदागर याला बोलावून घेतले. त्यानंतर दोघांनी मिळून एपीएमसी पोलिसांत फिर्याद दाखल केली.

केएलई-सीबीटी मार्गावर बसमधील प्रवाशाला हेरून त्याचे पाकीट मारणाऱ्यांची संख्या मध्यंतरी फोफावली होती. परंतु, पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांनी त्यांना पकडून चांगलीच अद्दल घडविली होती. त्यानंतर पाकीटमार शांत झाले होते. परंतु, आता पुन्हा त्यांनी डोके वर काढले असून, दुसऱ्या तालुक्‍यातील एका तरुणाला याचा फटका बसला आहे. 

Web Title: Belgaum News 50 thousand Theft in Bus