गोमांस वाहतूक प्रकरणी वाहन चालकासह दोघांवर गुन्हा

संजय सूर्यवंशी
बुधवार, 13 जून 2018

बेळगाव - गोमांस वाहतूक प्रकरणी वाहन चालकासह दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. या वाहनाचा चालक फरारी झाला आहे. दरम्यान वाहनात बसलेल्या अन्य एकाला मारहाण केल्या प्रकरणी पंधरा जणांविरोधात उद्यमबाग पोलिसांत गुन्हा दाखल झाला. बेळगाव दक्षिण व उत्तरचे आमदार रात्री उशिरापर्यंत ठाण्याजवळ थांबून होते. 

बेळगाव - गोमांस वाहतूक प्रकरणी वाहन चालकासह दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. या वाहनाचा चालक फरारी झाला आहे. दरम्यान वाहनात बसलेल्या अन्य एकाला मारहाण केल्या प्रकरणी पंधरा जणांविरोधात उद्यमबाग पोलिसांत गुन्हा दाखल झाला. बेळगाव दक्षिण व उत्तरचे आमदार रात्री उशिरापर्यंत ठाण्याजवळ थांबून होते. 

गोमांस भरलेले वाहन हुंचेनट्टीकडून बेळगावमार्गे गोव्याला निघाले होते. यावेळी पिरनवाडी क्रॉसजवळ काही हिंदूत्ववादी तरुणांनी हे वाहन अडविले. यामध्ये गोमांस असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी चालक व आणखी एकाला जाब विचारला. यावेळी चालक पळून गेला तर दुसरा तरुणांच्या तावडीत सापडला. त्याला मारहाण केल्याने येथे गर्दी जमली. इर्षाद महंमद रंगरेज असे जखमीचे नाव आहे. 

ठाण्यासमोर गर्दी 
गोमांसचे वाहन ठाण्यात नेल्यानंतर या ठिकाणी फिर्याद दाखल करून घेण्याची विनंती तरुणांनी केली. परंतु, हा भाग आपल्याकडे येत नसून, टिळकवाडी ठाण्याच्या हद्दीत येत असल्याचे सांगत आधी टाळाटाळ केली. रात्री साडेदहाच्या सुमारास बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील व उत्तरचे आमदार अनिल बेनके हे उद्यमबाग ठाण्याजवळ गेले. पोलिसांनी आधी त्यांच्याकडेही दूर्लक्ष केल्याने ते आक्रमक झाले. जोपर्यंत पोलीस आयुक्त येथे येत नाहीत तोपर्यंत येथून हलणार नाही, अशी भूमिका  त्यांनी घेतली. आयुक्त डॉ. डी. सी. राजप्पा यांनी या ठिकाणी येऊन समजूत घातली. 

15 जणांविरोधात गुन्हा 
वाहन ठाण्यात आणण्यापूर्वी एका तरुणाला मारहाण करत कायदा हातात घेतल्याचा ठपका ठेवत उद्यमबाग पोलिसांनी 15 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये आदिनाथ, नरेश यांच्यासह 15 जणांचा समावेश आहे. गोमांस वाहतूक प्रकरणी या दोघा तरुणांवरही गुन्हा दाखल झाला आहे. टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक प्रभू सूरीन हेच उद्यमबागचे प्रभारी आहेत. त्यांनी या घटनेची नोंद करून घेत तपास सुरू केला आहे. 

Web Title: Belgaum News Beef transport case