चार वर्षानंतर पुन्हा तीच जागा हडपण्याचा प्रयत्न 

जितेंद्र शिंदे
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

बेळगाव - चार वर्षांपूर्वी अतिक्रमीत शेड हटवून महापालिकेची 30 गुंठे जागा ताब्यात घेतली असतानाही पुन्हा त्याच ठिकाणी बेकायदा शेड उभारून राहणाऱ्या कुटुंबियांना हटवून महापालिकेने शेड पाडविले. बसव कॉलनीत शुक्रवारी (ता. 20) महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने ही कारवाई केली. 

केएलई रूग्णालयाजवळीत बसव कॉलनीत अतिक्रमण करण्यात आले होते. याची तक्रार महापालिका आयुक्‍त कृष्णगौडा तायण्णावर यांच्याकडे करण्यात आली होती. त्यांच्या आदेशानुसार शुक्रवारी (ता. 20) महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने पर्यावरण अभियंता उदयकुमार तळवार, कायदे सल्लागार यु. एच. महांतशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली शेड हटविले. बसव कॉलनीत महापालिकेच्या जागेवर शेड उभारून एक कुटुंबिय त्याठिकाणी राहात होते. त्यामुळे पथकाने कुटुंबियांना तेथून हटवून संपूर्ण शेड पाडविले. 

2014 साली याच 30 गुंठे जागेवर महापालिकेच्या वॉचमनने अतिक्रमण केले होते. शिवाय ही जागा स्वत:च्या नावावर करून घेतली. हा प्रकार लक्षात येताच अधिकाऱ्यांनी त्या वॉचमनचे शेड हटविले होते आणि जागा महापालिकेच्या ताब्यात घेतली होती. सुमारे 9 कोटी रूपयांची मालमत्ता महापालिकेने त्यावेळी वाचविली होती. पण, पुन्हा त्याच जागेवर अतिक्रमण झाले होते. आता पुन्हा त्याच जागेवर अतिक्रमण झाल्यामुळे महापालिकेचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. आज सकाळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख अर्जुन देमट्टी यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी अनधिकृत शेड हटविले.

Web Title: Belgaum News Encroachment in Basav Colony