औरादमधून नायक यांना मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची उमेदवारी 

जितेंद्र शिंदे
सोमवार, 30 एप्रिल 2018

बेळगाव - मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने जाहीर केल्यानुसार औराद (जि. बिदर) विधानसभा मतदार संघातून चंदररत्ना नायक यांची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली. सीमा लढ्यातील ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी मुतगा (ता. बेळगाव) येथे सोमवारी (ता. 30) झालेल्या बैठकीत ही घोषणा केली. 

सीमाभागातून अधिकाधिक उमेदवार निवडून यावेत आणि त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नाला बळकटी मिळावी, यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने यावेळी बिदर जिल्ह्यातूनही निवडणूक लढविण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार चंदररत्ना नायक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सोमवारी (ता. 30) त्या उमेदवारीवर शिक्‍कामोर्तब करण्यात आला. बैठकीला मध्यवर्ती समिती अध्यक्ष दीपक दळवी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने आतापर्यंत बेळगाव ग्रामीणमधून मनोहर किणेकर, बेळगाव दक्षिणमधून प्रकाश मरगाळे आणि खानापूरमधून आमदार अरविंद पाटील यांची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली होती. आता औरादमधून चंदररत्ना नायक यांची निवड करण्यात आली आहे. नायक यांनी प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांची भेट घेऊन आशिर्वाद घेतला. औराद हा मतदार संघ अनुसुचित जमातीसाठी राखीव असून त्याठिकाणी नायक यांना उमेदवारी देण्यात आली.

Web Title: Belgaum News Karnataka Assembly Election