बैलहोंगल मतदारसंघात भाजपमधील बंडखोरी कॉंग्रेसच्या पथ्यावर 

जितेंद्र शिंदे
मंगळवार, 15 मे 2018

* कौल विधानसभेचा - वार्तापत्र मतदारसंघ : बैलहोंगल 

हायहोल्टेज मतदारसंघात बैलहोंगलचा समावेश होतो. भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुराप्पा यांचे निकटवर्तीय डॉ. विश्‍वनाथ पाटील यांना बंडाळीचा फटका बसला आणि बैलहोंगलमध्ये कॉंग्रेसच्या महांतेश कौजलगी यांचा विजय झाला.

हायहोल्टेज मतदारसंघात बैलहोंगलचा समावेश होतो. भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुराप्पा यांचे निकटवर्तीय डॉ. विश्‍वनाथ पाटील यांना बंडाळीचा फटका बसला आणि बैलहोंगलमध्ये कॉंग्रेसच्या महांतेश कौजलगी यांचा विजय झाला. भाजपने माजी आमदार जगदीश मेटगूड यांना उमेदवारी नाकारल्यामुळे बंडाळी उफाळली आणि याचा थेट फटका भाजपला बसला. 

डॉ. विश्‍वनाथ पाटील 2013 मध्ये येडियुराप्पा यांच्या कर्नाटक जनता पक्षाकडून निवडून आले होते. 2014 मध्ये येडियुराप्पा पुन्हा भाजपमध्ये परतल्यानंतर डॉ. पाटील सुध्दा भाजपमध्ये आले. पुढे त्यांना भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्षपद देण्यात आले. येडियुराप्पा यांना प्रदेशाध्यक्षपद मिळाल्यामुळे त्यांनी डॉ. पाटील यांचीच बाजू उचलून धरली. भाजपचे मूळ दावेदार माजी आमदार जगदीश मेटगुड यांना डावलून डॉ. पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. परिणामी, मेटगूड यांनी भाजप विरोधात बंडाळी केली. येडियुराप्पा यांच्या प्रतिकृती जाळून संताप व्यक्‍त करण्यात आला. 

निवडणुकीत कॉंग्रेसने आपली चाल सावधपणे खेळत पंधरा वर्षांपूर्वी गमावलेला गड पुन्हा खेचून आणला. महांतेश कौजलगी यांनी मतदारांपर्यंत पोचून दोन्ही उमेदवारांना समर्थ टक्‍कर दिली. त्यामुळेच सुमारे चार हजार मतांनी विजय संपादन केला. डॉ. विश्‍वनाथ पाटील आणि जगदीश मेटगुड यांच्यात झालेल्या मतविभागणी फायदा कॉंग्रेसला झाला. विशेष म्हणजे डॉ. पाटील यांच्यापेक्षा बंडखोर मेटगूड यांनी जास्त मते घेतली. त्यामुळे, कौजलगी यांचा विजय सोपा झाला. तसेच पंधरा वर्षापासून सुरु असलेला कॉंग्रेसचा दुष्काळही संपला आहे. 

मतांची आकडेवारी 

  • महांतेश कौजलगी (कॉंग्रेस) : 33,934 
  • जगदीश मेटगुड (भाजप बंडखोर) : 29,545 
  • विश्‍वनाथ पाटील (भाजप) : 25,369 
     
Web Title: Belgaum News Karnataka Assembly Election