कागवाड मतदारसंघात कॉंग्रेसच्या श्रीमंत पाटील यांची मुसंडी 

रंगनाथ देशिंगकर 
मंगळवार, 15 मे 2018

अथणी -  कागवाड विधानसभा मतदारसंघात झालेल्या अटीतटीच्या व ऐतिहासिक निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार श्रीमंत पाटील हे विजयी झाले. या मतदारसंघात भाजप, कॉंग्रेस, धजद अशी तिरंगी लढत होती.

अथणी -  कागवाड विधानसभा मतदारसंघात झालेल्या अटीतटीच्या व ऐतिहासिक निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार श्रीमंत पाटील हे विजयी झाले. या मतदारसंघात भाजप, कॉंग्रेस, धजद अशी तिरंगी लढत होती. प्रत्यक्षात भाजप व कॉंग्रेसच्या या दोन राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांत चुरशीची लढत झाली. कागवाडमधून विद्यमान आमदार राजू कागे हे या अगोदर चारवेळा निवडून आले आहेत. ते पाचव्यांदा निवडणुकीस उभे होते. त्यांचा पराभव करून कॉंग्रेसने जबरदस्त मुसंडी मारली आहे. 

कॉंग्रेसचे उमेदवार श्रीमंत पाटील यांनी या वेळी कॉंग्रेसमधून नियोजनबद्ध प्रचार केला. या अगोदर त्यांनी दोनवेळा धर्मनिरपेक्ष जनता दलामधून निवडणूक लढविली होती. सतत हुलकावणी देण्याऱ्या आमदारकीने अखेर या निवडणुकीत श्रीमंत पाटील यांच्या गळ्यात विजयाची माळ घातली. 

धजदचे उमेदवार माजी आमदार कल्लाप्पाण्णा मगेण्णावर यांनी या मतदारसंघातून प्रथमच निवडणूक लढविली. कॉंग्रेसचे उमेदवार श्रीमंत पाटील हे गेल्या वीस वर्षांपासून अथणी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. कारखान्याच्या माध्यमातून तालुक्‍याच्या उत्तर भागात त्यांनी 12 हजार एकर जमीन ओलिताखाली आणली आहे. कामगारांना काम दिले आहे. समाजातील विविध घटकांना साहाय्य केले आहे. त्याचा सकारात्मक परिणाम या निकालातून दिसून आला. 

निवडणूक प्रचारात त्यांनी मतदारसंघात रोजगार, उद्योग, जमीन क्षारपड जमीन पिकांसाठी योग्य करण्यावर भर, शेतीस नियमित वीजपुरवठा, अशी व्यवस्था केली जाईल. मतदारसंघ भ्रष्टाचारमुक्त होऊन आदर्श होण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्‍वासन दिले गेले. कागवागडमधील पराभव भाजपला विचार करायला ठरला आहे. 

Web Title: Belgaum News Karnataka Assembly Election