संभाजी भिडे यांना पुन्हा बेळगाव जिल्ह्यात प्रवेशबंदी

मल्लिकार्जुन मुगळी
गुरुवार, 19 जुलै 2018

बेळगाव - शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर पुन्हा बेळगाव जिल्हा प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. 21 ते 31 जुलै या काळासाठी ही प्रवेशबंदी आहे.

बेळगाव - शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर पुन्हा बेळगाव जिल्हा प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. 21 ते 31 जुलै या काळासाठी ही प्रवेशबंदी आहे.

बेळगावचे जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला यांनी बुधवारी रात्री उशिरा याबाबतचा आदेश बजावला आहे. याआधी दोनवेळा भिडे यांना बेळगाव जिल्ह्यात प्रवेश करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली होती. 21 जुलै रोजी संकेश्वर येथे भिडे यांचे व्याख्यान होणार आहे. शिवप्रतिष्ठानच्या संकेश्वर शाखेच्यावतीने रायगडावरील सुवर्ण सिंहासनाचा इतिहास या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. पण भिडे यांच्या व्याख्यानामुळे सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हाधिकारी झियाउल्ला यांनी त्यांना बेळगाव जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.

Web Title: Belgaum News no entry to Sambhaji Bhide