
बंगाल विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे.
बंगाल विधानसभेत भाजप-टीएमसी आमदारांत जोरदार राडा
बंगाल विधानसभेत (Bengal Assembly) मारहाणीचं प्रकरण समोर आलंय. भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या आमदारांमध्ये जोरदार हाणामारी झालीय. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, बंगाल विधानसभेत भाजप आमदार मनोज तिग्गा (Manoj Tigga) आणि टीएमसी (TMC) आमदार असित मजुमदार (Asit Majumdar) यांच्यात जोरदार हाणामारी झाली. या भांडणात असित मजुमदार जखमी झाले असून या प्रकरणी पाच आमदारांचं निलंबन झाल्याचं कळतंय.
बंगाल विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. या मारहाणीनंतर भाजपचे आमदार विधानसभेतून बाहेर पडले आहेत. भाजप आमदारांनी (BJP MLA) आरोप केलाय की, विधानसभेत बीरभूमवर (Birbhum Violence) चर्चा करत असताना टीएमसी आमदारांनी (TMC MLA) गोंधळ घालायला सुरुवात केली आणि भाजपच्या आमदारांना मारहाण केलीय, असं त्यांनी नमूद केलंय.
हेही वाचा: बीरभूम हत्याकांडप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांना अटक होणार?
भाजप आमदार मनोज तिग्गा यांनी विधानसभेच्या बाहेर निदर्शनादरम्यान सांगितलं की, टीएमसी आमदारांनी मला धक्काबुक्की करुन मारहाण केलीय. शिवाय, या भांडणात माझा शर्टही फाडण्यात आलाय, असं त्यांनी सांगितलं. यानंतर भाजपचे आमदार आणि बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी विधानसभेबाहेर घोषणाबाजी करण्यास सुरुवात केलीय. या प्रकरणानंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसतंय.
Web Title: Bengal Assembly Scuffle Tmc Bjp Manoj Tigga Asit Majumdar Birbhum Violence Case
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..