प. बंगालमध्ये हिंसाचार अन् जंगलराज; राज्यपालांचा ममतांवर हल्लाबोल | Riot In West Bengal | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Riot

प. बंगालमध्ये हिंसाचार अन् जंगलराज; राज्यपालांचा ममतांवर हल्लाबोल

कोलकाता : पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यात TMC नेत्याच्या हत्येनंतर उसळलेल्या हिंसाचारात आठ जणांना जिवंत जाळल्याचा प्रकारानंतर मृत्युमुखी पडलेल्याबद्दल राज्यपाल जगदीप धनखर (Jagdeep Dhankhar) यांनी शोक व्यक्त केला आहे. यासोबतच राज्यपालांनी बंगाल सरकारवरही जोरदार हल्लाबोल करत, ही घटना म्हणजे राज्य हिंसाचार आणि जंगलराज संस्कृतीच्या हातात असल्याची टाकी केली आहे. धनखर यांनी व्हिडिओ ट्वीटकरत ममता (Mamta Benerjee) सरकारवर या घटनेनंतर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. राज्यपालांच्या या वक्तव्यावर अद्यापर्यंत राज्य सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. (West Bengal Governer Jagdeep Dhankhar Reaction After Riot)

या घटनेने मला खूप दुःख झाले असून, यासंदर्भात आपण मुख्य सचिवांकडून अहवाल मागवल्याचे राज्यपालांनी सांगितले असून, या घटनेची चौकशी करण्यासाठी ममता बॅनर्जी सरकारने एक समिती स्थापन केली आहे. या घटनेत सुमारे 10 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, प्रशासनाने केवळ 8 जणांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे.

हिंसा का उसळली

बंगालमधील बीरभूममधील रामपूरहाट येथे सोमवारी रात्री उशिरा पंचायत नेते भादू शेख यांची हत्या करण्यात आली. शेख हे राज्य महामार्ग 50 वरून जात होते. त्यावेळी अज्ञातांनी त्याच्यावर बॉम्ब फेकला, ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना रामपूरहाट येथील मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Web Title: Bengal In Grip Of Violence And Lawlessness Says West Bengal Governer Jagdeep Dhankhar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..