Revenue Officers Arrest : बनावट मृत्यू प्रमाणपत्र अन् वंशावळ! मठाची 100 कोटींची जमीन हडपण्याचा डाव; 6 महसूल अधिकाऱ्यांसह 11 जणांना बेड्या

Bengaluru Land Scam 11 Arrested in ₹100 Crore Fraud Case : बंगळूरमध्ये आदिचुंचनगिरी शिक्षण ट्रस्टची ₹१०० कोटींहून अधिक किमतीची सहा एकर जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे बळकावण्याचा प्रयत्न उघड झाला. सहा महसूल अधिकाऱ्यांसह ११ जणांना अटक करण्यात आली.
Bengaluru Adichunchanagiri Trust land scam 2026

Bengaluru Adichunchanagiri Trust land scam 2026

esakal

Updated on

बंगळूर : आदिचुंचनगिरी मठाच्या शिक्षण ट्रस्टच्या मालकीची १०० कोटींहून अधिक किमतीची सुमारे सहा एकर जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे बळकावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सहा महसूल अधिकाऱ्यांसह ११ जणांना पोलिसांनी अटक (Karnataka fake land documents case) केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये दोन उपतहसीलदार, दोन महसूल निरीक्षक, दोन ग्राम प्रशासन अधिकारी तसेच मुख्य आरोपी फ्रान्सिस, आरोग्यस्वामी, श्रीनिवासू, नरेंद्रकुमार आणि जोसेफ यांचा समावेश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com