International Cocaine Smuggling Case
esakal
बंगळूर : आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करीत आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उच्च दर्जाचे कोकेन मुलांच्या काल्पनिक गोष्टींच्या पुस्तकांत लपवून भारतात (International Cocaine Smuggling Case) आणल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर (केआयए) कस्टम्सच्या एअर इंटेलिजन्स युनिटने (एआययु) चिली देशातील ७० वर्षीय नागरिकाला अटक करत सुमारे ७.७ किलो कोकेन जप्त केले.