Bengaluru Child Assault Incident
esakal
बंगळूर : दक्षिण बंगळूरमधील बनशंकरी पोलिसांनी (Banashankari Police Case) रस्त्यावर खेळणाऱ्या पाच वर्षांच्या मुलाला लाथ मारल्याच्या घटनेप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता. १९) दिली. दरम्यान, राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने ही घटना खूप गांभीर्याने घेतली असून, खटला दाखल करणार असल्याचे म्हटले आहे.