Bengaluru College Case
esakal
बंगळुरू : एका खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शौचालयात २१ वर्षीय विद्यार्थिनीवर वर्गमित्राने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना (Bengaluru College Case) उघडकीस आली आहे. आरोपीने अत्याचारानंतर पीडितेला गर्भपाताची गोळी हवी आहे का, असा सवाल केला होता. ही घटना १० ऑक्टोबर रोजी घडली असून तब्बल पाच दिवसांनी ती बाहेर आली. १५ ऑक्टोबर रोजी पीडितेने हनुमंतनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.