Rescue personnel evacuate stranded citizens in a flooded Bengaluru locality using boats after incessant rainfall.sakal
देश
Bangalore Monsoon Rains: बंगळूर शहरात पावसाचा हाहाकार! ठिकठिकाणी रस्ते जलमय; बोटीद्वारे नागरिकांना बाहेर काढले
अनेक अपार्टमेंटमधील तळमजले पाण्याखाली गेले. रविवारी मध्यरात्रीपासून पाऊस पडला असून, पूरस्थिती निर्माण झाली आहे. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले आहे.
बंगळूर : ढगफुटीसदृश्य पावसामुळे बंगळूर शहरात आज हाहाकार उडाला. पावसाच्या रौद्ररूपाने शहर जलमय झाले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री तसेच बंगळूर नगरविकास मंत्री आणि डी. के. शिवकुमार यांनी परिस्थितीचा आढावा घेत कायमस्वरुपी उपाययोजनावर भर दिला जाणार असल्याचे सांगितले.

