IPS Officer Video Controversy
esakal
बंगळूर : नागरिक हक्क अंमलबजावणी संचलनालयाचे महासंचालक (डीजीपी) असलेले वरिष्ठ आयपीएस अधिकारी रामचंद्र राव (IPS Officer Ramchandra Rao Viral Video) यांचा कार्यालयातच एका महिलेसोबत गैरवर्तन करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमवारी (ता. १९) गृह विभागाला दिले.