Bengaluru Police
esakal
देश
Bengaluru Police : पोलिस अधिकारी असल्याचे भासवून लाखोंची फसवणूक; महाराष्ट्रातील आठजणांसह 16 जण ताब्यात, मोठं रॅकेट असण्याची शक्यता!
Bengaluru Police Bust Fake Officer Fraud Gang : एचएसआर लेआउट पोलिसांनी स्वतःला अधिकारी म्हणून सादर करून धमकी देत फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. १६ आरोपी अटकेत असून महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले आहेत.
Summary
एचएसआर लेआउट पोलिसांनी मोठी कारवाई करून टोळीला अटक केली.
खोटे अधिकारी बनून नागरिकांकडून लाखोंची फसवणूक करण्यात आली.
१६ आरोपींना अटक करून साहित्य जप्त करण्यात आले.
बंगळूर : पोलिस अधिकारी (Bengaluru Police) आणि तपास संस्थांचे अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांना गुन्हेगारी प्रकरणात अडकवण्याची धमकी देत लाखोंची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात एचएसआर लेआउट पोलिसांना यश आले. या प्रकरणात १६ आरोपींना अटक करण्यात आली असून साहित्य जप्त केले आहे.