
बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर बुधवारी झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये कर्नाटकच्या हसन जिल्ह्यातील 21 वर्षीय भूमिक लक्ष्मण याचाही समावेश आहे. या घटनेनंतर भूमिकचे वडील बी.टी. लक्ष्मण यांचा मुलाच्या समाधीवर रडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. "मला कुठेही जायचे नाही, मलाही इथेच राहायचे आहे," असे म्हणत ते जमिनीवर लोळत रडताना दिसत आहेत. हा हृदयद्रावक प्रसंग पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले आहे.