

startup hub
sakal
बंगळूर : ‘वुई आर सीटी-२०२६’ अहवालानुसार भारतातील प्रमुख शहरांमध्ये बंगळूरने रोजगार, कौशल्य, स्टार्टअप गुंतवणूक आणि महिलांच्या कार्यस्थळातील सहभाग या सर्व बाबींमध्ये आघाडी कायम राखली आहे. दिल्ली एनसीआर आणि मुंबई आर्थिकदृष्ट्या मजबूत असली तसेच हैदराबाद राहणीमानात (लाइव्हॅबिलिटी) चांगली कामगिरी करत असली, तरी नोकरीच्या संधी, प्रतिभा आणि नवोपक्रमाच्या दृष्टीने बंगळूर देशातील प्रमुख केंद्र ठरले आहे.