
बंगळूर : शहरामध्ये गेल्या ३६ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मंगळवारीही (ता. २०) जनजीवन विस्कळीत झाले. अनेक ठिकाणी रस्त्यावर गुडघ्यापर्यंत पाणी साचले होते त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. राज्यात पावसाशी संबंधित आपत्तींमध्ये मृतांची संख्या पाच झाली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.