
सुंदरला 2014 मध्ये कोल्हापुरातून बेंगळुरूतील बीबीबीपी इथं नेण्यात आलं होतं. तेव्हापासून सुंदर तिथेच आहे.
बेंगळुरू - कानात आग होत असेल किंवा स्वच्छ करण्यासाठी आपण इअर बड नाहीतर आगपेटीची काडी वापरतो. आगपेटीची काडी वापरणं धोकादायक असल्याचं डॉक्टर सांगतात. याशिवाय करंगळीच्या सहाय्याने कान स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतात. माणसाप्रमाणेच प्राणीही असे करत असल्याचं कधी पाहिलं नसेल. पण आता एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात हत्ती काठीने कान खाजवत असलेला दिसते. बेंगळुरूतील बन्नेरघट्टा जैविक उद्यानातील हा व्हिडिओ आहे.
आशियाई हत्तींनी हे दाखवून दिलं की त्यांच्याकडेही एखाद्या वस्तूचा वापर आणि त्यांची आकलन क्षमता कमी नाही. हत्ती हा हुशार प्राणी म्हणूनही ओळखला जातो. बेंगळुरूतील ज्या हत्तीचा व्हिडिओ व्हायरल होतोय त्याचं नाव सुंदर असं आहे. महाराष्ट्रातील कोल्हापुरातून त्याला बेंगळुरूत नेण्यात आलं होतं. तो एका वाळलेल्या काठीने कान आणि तोंड खाजवताना दिसतो. सुंदरला 2014 मध्ये कोल्हापुरातल्या मंदिरातून बेंगळुरूतील बीबीबीपी इथं नेण्यात आलं होतं. तेव्हापासून सुंदर तिथेच आहे. त्याच्यासोबत मेनका नावाची हत्तीणसुद्धा गळा आणि पोटाचा खालचा भाग काठीने खाजवत असल्याचं दिसत आहे.
#WATCH: Two elephants spotted using twigs to comfort themselves at Bannerghatta Biological Park near Bengaluru in Karnataka. pic.twitter.com/JsPbcoNABp
— ANI (@ANI) July 24, 2020
बीबीबीपीचे कार्यकारी संचालक वनश्री बिपीन सिंग यांनी सांगितलं की, हत्ती एखाद्या वस्तूचा वापर करणे नवीन नाही मात्र त्याचा वापर करण्याची पद्धत त्यांच्यावर अवलंबून असते. नागरहोले नॅशनल पार्कमध्ये 2001 साली अशी माहिती समोर आली होती की, मधमाशांपासून बचाव करण्यासाठी हत्ती झाडाच्या फांद्यांचा चाणाक्षपणे वापर करतात.
पाहा Video: हेलिकॉप्टर आणि ट्रक यांच्यात झाली टक्कर? पण
वस्तूंची निर्मिती आणि वापरासाठी आवश्यक असलेली बुद्धी ही माकडांपेक्षा कमी नाही हेच यातून दिसून येतं. कावळ्यासह अनेक पक्षी, डॉल्फिन, माकड आणि ऑक्टोपस यांच्यामध्येही कठीण परिस्थितीत उपलब्ध साधनांचा वापर करण्याची क्षमता असते. यासाठी या प्राणी आणि पक्ष्यांना ओळखलं जातं.