
बैतूल जिल्ह्यात वऱ्हाडानं भरलेला ट्रॅक्टर पलटी झाला आहे.
वऱ्हाडाच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी होऊन 5 ठार, 20 जखमी
बैतूल : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) बैतूल जिल्ह्यात (Betul District) वऱ्हाडानं भरलेला ट्रॅक्टर पलटी झाला असून या अपघातात 5 जणांचा मृत्यू झालाय, तर 20 जण जखमी झाले आहेत. सध्या गंभीर जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी रात्री उशिरा बोंद्री गावातून (Bondri Village) वऱ्हाड परतत असताना हा अपघात झाला. कान्हेगाव ते केशिया दरम्यान हा अपघात झाला असून ही घटना चिचोली पोलीस ठाण्याच्या (Chicholi Police Station) हद्दीत घडलीय.
ट्रॅक्टर-ट्रॉली (Tractor-Trolley Accident) कान्हेगाव येथून बाहेर पडली, तेव्हा ट्रॅक्टरचा वेग अधिक असल्याचं सांगण्यात येतंय. चालकाच्या निष्काळजीपणामुळं हा अपघात घडल्याचंही बोललं जातंय. दरम्यान, जखमींना डायल-100 च्या मदतीनं चिचोली सामुदायिक आरोग्य केंद्रात (Chicholi Health Center) पाठवण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, बोंद्री गावातील लोक लग्नानंतर वधूला आणण्यासाठी गेल्याचं कळतंय.
हेही वाचा: कानपूर दंगलीवरून राजकारण तापलं; मायावती स्पष्टच म्हणाल्या, राष्ट्रपती-पंतप्रधानांनी..
रात्री अचानक मोठा आवाज झाल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं. सुरुवातीला त्यांनाही काहीच समजलं नाही, पण नंतर कळलं की काहीतरी अपघात झालाय. ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले असता, ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. ग्रामस्थांनी ट्रॉली बाजूला करुन जखमींना बाहेर काढलं. काही लोकांनी डायल-100 वर कॉलही केला होता. डायल-100 टीम घटनास्थळी पोहोचली आणि तपास केल्यानंतर 5 जणांचा मृत्यू झाल्याचं आढळून आलं. यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही माहिती देण्यात आलीय.
Web Title: Betul 5 Died 20 Injured In Massive Road Accident Tractor Trolley Carrying Baratis Overturned In Mp
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..