
जयपूर : विद्यार्जनाला वय नसते हेच खरे! माणूस शेवटपर्यंत शिकत राहतो. तसे पाहता तो आजन्म विद्यार्थीच असतो, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. येथील ताराचंद अग्रवाल या सत्तरी ओलांडलेल्या आजोबांसाठी हे वर्णन तंतोतंत लागू पडते. कधीकाळी बँकेतून व्यवस्थापक म्हणून निवृत्त झालेले अग्रवाल हे मागील आठवड्यामध्ये चक्क सनदी लेखापालाची (सीए) परीक्षा उत्तीर्ण झाले.