agra kailas shiv mandir
sakal
श्रावण महिन्यापूर्वी उत्तर प्रदेशातील आग्रा येथील ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व असलेले कैलास महादेव मंदिर नव्या रूपात भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. उत्तर प्रदेश सरकारने सुमारे १५.२६ कोटी रुपयांच्या निधीतून मंदिर परिसर आणि यमुना नदीच्या काठाचा विकास पूर्ण केला आहे. या कायापालटामुळे हे ठिकाण धार्मिक श्रद्धेसोबतच आग्र्यातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ म्हणूनही विकसित झाले आहे.